Free Tablet Yojana 2025 : 10 वी पास मुला-मुलींना फ्री टॅबलेट वाटप योजना सुरू; येथे आत्ताच करा अर्ज..,

Apply Online Free Tablet Yojana 2025-27 Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, चालू 10 वी पास झालेल्या मुला मुलींना “JEE/NEET/MHT-CET” चा अभ्यास करण्यासाठी मोफत टॅबलेट या योजने मार्फत दर वर्षी वाटप केले जातात. तर तुम्ही सुध्दा 2025 मध्ये 10 वी पास झाले असतील, व 10 वी नंतर 11 वी Science ला Admission घ्यायचे असेल. तर तुम्हाला ही Free Tablet मिळू शकते.

Free Tablet Yojana 2025 Form Apply Online Registration Maharashtra Mahajyoti :-
JEE/NEET/MHT-CET – Batch – 2025-27 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील ईतर मागासवर्गीय ,भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT -CET – Batch – 2025-27 करिता परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येते आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

Benefits of free tablet yojana 2025

1मोफत टॅबलेट मिळेल
2फ्री 6 GB इंटरनेट दररोज
3MHT-CET/JEE/NEET मोफत प्रशिक्षण
4हा टॅब तुम्हाला कायम स्वरुपी मिळेल.

टॅबलेट योजनेच्या लाभासाठी पात्रता | Free tablet yojana eligibility maharashtra

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
2. विद्यार्थी ईतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा /असावी तसेच विद्यार्थी नॉन – क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
3. सन 2025 मध्ये दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांची निवड त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण नुसार करण्यात येईल.
6. विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

7. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीला 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Free tablet yojana document list in marathi

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate )
4. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non -Creamy Layer Certificate)
5. 10 वी चे मार्कशिट
6. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | Free tablet yojana 2025 maharashtra last date

फ्री मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदतवाढ झाली आधी 31 मे 2025 तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 आहे. होती त्यानंतर 20 जुलै 2025 होती तारखे पुन्हा बदल झाला आहे. इयत्ता अकरावीच्या ऍडमिशन उशिरा होत असल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आले आहे. शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे.  होती पण पुन्हा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत वाढ झाली होती आत शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत .काही फेर बदलत झाला किंवा मुदतवाढ झाली तर वेबसाईट वरती माहिती Update करण्यात येईल.

अर्जदार हा खाली दिलेल्या प्रवर्गाचा असावा. जर खाली दिलेला प्रवर्ग तुमचा नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. जर तुम्ही General/SC/ST/EWS प्रवर्गाचे असाल तर अर्ज करू शकत नाही.

अ. क्रकॅटेगरी टक्केवारी
1इतर मागास वर्ग (OBC)59%
2विमुक्त जाती – अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती – ब (NT-B)8%
4भटक्या जमाती – क (NT-C)11%
5भटक्या जमाती – ड (NT-D)6%
6विशेष मागास प्रवर्ग (SBC)6%
एकूण 100%

समांतर आरक्षण पुढलप्रमाणे
1) प्रवर्गणीहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2) दिव्यांगा करिता 4% जागा आरक्षित आहे.
3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

📢 सूचना – शहरी तसेच ग्रामीण भागांकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल.

अर्ज कसा करावा | Mahajyoti free tablet yojan online registration link

  1. महाजोतीच्या www.mahajyoti.org . in या संकेतस्थळावर जाऊन Notic Board मधील “Application for JEE/NEET/ MHT-CET – Batch – 2025- 27 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 अर्ज करण्याची वेबसाईटwww.mahajyoti.org
 जाहिरात PDFडाउनलोड करा
 मुदतवाढ परिपत्रक 1डाउनलोड PDF 
 मुदतवाढ परिपत्रक 2डाउनलोड PDF
 मुदतवाढ परिपत्रक 3डाउनलोड PDF
 मुदतवाढ परिपत्रक 4डाउनलोड PDF
 मुदतवाढ परिपत्रक 5डाउनलोड PDF
 मुदतवाढ परिपत्रक 6डाउनलोड PDF

1. अर्ज करण्याची अंतिम दि. 31 मे 2025 होती याच्या मुदतवाढ झाली 20 जून 2025 शेवटची तारीख आहे. 20 जुलै 2025 होती त्यानंतर 31 जुलै 2025 होती पण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तारखेत मुदतवाढ होती पण परत चौथ्यांदा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ झाली होती. इयत्ता अकरावीचे ऍडमिशन उशिरा होत असल्यामुळे आता मुदत वाढ होऊन शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 केले आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे ,मुदतवाढ देणे अर्ज करणारे व स्वीकारणारे तसेच निवडीची पद्धती बदलली याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
4. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीचे, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
5. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा : संपर्क क्र – 0712-2870120/21
E-mail ID : mahajyotimpsc21@gmail.com

ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर टॅबलेट कधी मिळेल | When will you get the tablet after filling the online form
विद्यार्थी मित्रांनो फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म मध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तसेच फॉर्म मध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली जाईल.
त्यानंतर नियमानुसार मेरिट लिस्ट लावली जाईल. तसेच waiting list सुध्दा लावली जाईल. पात्र सलेल्या विद्यार्थ्यांना कॉल करू टॅब घेण्यासाठी जिल्हा निहाय ऑफिस वरती टॅब घेण्यासाठी बोलावण्यात येईल.

New born baby kit : बेबी केअर किट योजना अर्ज सुरू; मिळवा 2000 चे मोफत किट, येथे करा अर्ज..,

Leave a Comment