Ladki Bahin Yojana : १५०० नव्हे ३००० येणार? लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार; पन यांनाच मिळणार पैसे..,

Ladki Bahin Yojana August Installment News : नमस्कार लाडक्या बहिनींनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली असून याबाबत १५०० रूपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून ऑगस्ट हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. जून २०२४ पासून ही योजना सुरु केली असून आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.,

मात्र सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही. यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु याबाबत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले आहे.

त्याचबरोबर, सरकारचा लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा संकल्प आहे. या योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाचप्रकारे सुरु राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. असेही आदिती तटकरे यांनी म्हटले. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच ३००० रुपये एकत्र येणार का? असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ही योजना वाचा :- APL Shetkari Ration Anudan : शेतकऱ्यांना आत्ता अन्नधान्याऐवजी मिळणार पैसे; प्रती व्यक्ति 170 रुपये, फक्त याच 14 जिल्ह्यातील लोकांना मिळणार..,

 ‘या’ कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

‘कुटुंबाच्या व्याख्येनुसार एकवीस वर्षांखालील व पासष्ट वर्षांवरील ‘लाडकी’ अपात्र ठरणार आहे. राज्य शासनाची जिल्ह्यात एक जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली. या योजनेमध्ये एकूण पात्र अर्जदार महिला १० लाख ४७ हजार ७३० होत्या. या लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण १७ हप्ते देण्यात आले आहेत.

सध्या २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील १४ हजार २५४ महिलांची पडताळणी सुरू आहे. तसेच, एकाच घरात दोन लाभार्थी महिला असलेली संख्या ८७ हजार १९५ असून, यांचीही पडताळणी सुरू आहे. पडताळणीनंतर सुमारे दहा टक्के महिलांची संख्या घटण्याची शक्यता आहे’, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने दिली.

कुटुंबाच्या व्याख्येनुसार एका घरात सासू आणि तिच्या चार सुना असतील तरी त्या पात्र ठरणार आहेत. मात्र त्या सुनांच्या अविवाहित किंवा विवाहित मुलींपैकी केवळ एक मुलगी पात्र ठरणार आहे. यामध्ये विधवा महिला असल्यास त्यांनाही लाभ मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जुलै २०२४ मध्ये १७ वा हप्ता देण्यात आला होता. जिल्ह्यात महिन्याला सुमारे १५५ कोटी रुपये द्यावे लागतात. पडताळणीनंतर यामध्ये कपात होणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या आवाहनानुसार स्वयंस्फूर्तीने या योजनेतून बाहेर पडलेल्या महिलांची संख्या २६३ झाली आहे. २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिलांचा लाडकी बहिण योजनेचा हप्ता बंद होणार आहे. अंगणवाडी सेविका, सुपरवायझर व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने पडताळणीचे काम सुरू आहे. तसेच, एका घरात दोन लाभार्थी महिला असल्यास विवाहित महिला व तिची अविवाहित मुलगी यांना लाभ मिळणार आहे. यापैकी एका लाभार्थी महिलेचा लाभ बंद होणार आहे. पडताळणीनंतर सुमारे दहा टक्के महिलांची संख्या घटेल, अशी स्थिती आहे.

शासकीय नोकरी, चांगली आर्थिक परिस्थिती व कारवाईच्या भीतीमुळे अनेक महिला या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी पुढे आल्या आहेत. ज्या महिलांना स्वयंप्रेरणेने लाभ बंद करायचा आहे, त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात हआले आहे.

लाडकी बहीण २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana – २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता, जाहिरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. आम्ही जाहिरनाम्यात २१०० रुपयांचं आश्वासन दिलं होते. ते आम्ही नक्कीच पूर्ण करु. पण, सध्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ नियमितपणे पोहोचणे याला सरकारचं प्राधान्य आहे. योग्य वेळी २१०० रुपयांचा लाभ लाडक्या बहि‍णींना पोहोचेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

Leave a Comment